उद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…

सहिष्णुता आणि अत्याचाराविरुद्ध लढ़ा देणाऱ्या महिलांचे चित्रण करणारा ‘रेसिस्ट’ हा कोंकणी लघुपट, १५ ऑगस्ट रोजी यूट्यूबवर प्रदर्शित होत आहे. कुणाल आणि हर्षला पाटिल बोरकर ह्यांच्या कुंहर्ष प्रोडक्शनने या लघुपटाची निर्मिती केली आहे.
या लघुपटाचे दिग्दर्शक कुणाल बोरकर यांनी सांगितले की, या लघुपटाच्या माध्यमातून महिलांच्या नजरेसमोर आणायचे आहे की फक्त एक महिलाच आपल्या हक्काचे संरक्षण करुन आत्याचाराविरूध्द उभी राहू शकते. तिच्या अंतस्करणांत असलेल्या शक्तीची जाणीव तिला व्हावी हाच एकमात्र मूळ उद्देश ह्या आहे. आपल्या समाजात चालु असलेल्या लिंग समानतेच्या दिशेने एक पाउल टाकण्याची सुरवात म्हणून कुंहर्ष प्रोडक्शन हा लघुपट स्वतंत्र्यदिनी प्रदर्शित करत असल्याचेही आवर्जून नमूद केले.
‘रेसिस्ट’मध्ये हर्षला पाटिल बोरकर , लता राजेश पाटिल , तानिया शिरोडकर , प्रदोष प्रभू, कुणाल बोरकर, बालकलाकार आध्या गांगुली हे प्रमुख भूमिकेत असून, सिद्धार्थ सालस्कर ,अनंत सावंत , राहुल बांधेकर ,अनिकेत नाईक , साहिल नाईक ,प्रथमेश पागी , श्रद्धा पागी , आणि स्वयम पागी यांनी सहाय्यक भूमिका केल्या आहेत.
साईश म्हामळ यांनी संगीतबध्द केलेला हा लघुपट 15 ऑगस्ट रोजी कुंहर्ष क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here