नानीच्या ‘व्ही’ चा प्रीमिअर होणार प्राईमवर…

v

अमेझॉन प्राईम व्हिडीओने आपल्या आगामी तेलुगु एक्शन थ्रिलर ‘वी’च्या वर्ल्ड प्रीमियरची घोषणा केली आहे. या चित्रपटात सुपरस्टार स्टार ’नानी’ मुख्य भूमिकेत असून सोबत अदिति राव हैदरी, सुधीर बाबू आणि निवेथा थॉमस महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. ज्याचे दिग्दर्शन आणि लेखन मोहन कृष्ण इंद्रगांती यांनी केले आहे. भारतासोबत 200 देश आणि प्रदेशात प्राइम सदस्य 5 सप्टेंबर, 2020 पासून हा चित्रपट ‘वी’ अमेझॉन प्राईमवर स्ट्रीम करू शकतील.

उद्या होणार ‘रेसिस्ट’ प्रदर्शित…
V
याविषयी बोलताना सुपरस्टार नानी म्हणाला की, “मला स्वतःला एक्शन-थ्रिलर बघायला आवडतात आणि ‘वी’ एक अशी फिल्म आहे, जी, रोमांच, नाट्य आणि जबरदस्त एक्शनने भरपूर आहे. या प्रॉजेक्टमध्ये सुधीर बाबू आणि माझ्या व्यक्तिरेखेमधील उंदरा-मांजराच्या खेळाने मला सर्वात जास्त आकर्षित केले आहे. मी ‘वी’ च्या ग्लोबल प्रीमियरसाठी खूप उत्साहित आहे – ही माझी 25वी फ़िल्म आहे आणि माझे प्रशंसक आणि चाहत्यांसाठी याहून मोठ्या ट्रिब्यूटची मी कल्पनाच नाही करू शकत, जी या चित्रपटाला प्राईम व्हिडीओवर 200 देश आणि प्रदेशात कुठेही, कधीही पाहू शकतील. अजून एक महत्त्वाची गोष्ट ही की या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर 5 सप्टेंबरला होतो आहे, याच दिवशी माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here