ग्रामीण  प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…

vartul

पिंपरी चिंचवड फिल्म क्लबच्या वतीने आयोजित ‘पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव’मध्ये येथील हरहुन्नरी कलावंत आशिष निनगुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या  ‘वर्तुळ’ या माहितीपटाची विशेष निवड करण्यात आली आहे. कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीमुळे हा चित्रपट महोत्सव सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 
अन्न,वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत.परंतु आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जगात माणूस संपूर्ण अडकून गेला आहे. पैशांच्या मागे लागतांना खरं सुख म्हणजे नेमके काय असते? याचा त्याला विसर पडत चालला आहे. श्रीमंत माणसे अधिक श्रीमंत होत आहेत,तर गरीब हे आणखी गरिबीला झुकले आहेत. त्यात गावाकडच्या लोकांची भीषण अवस्था आहे. शहरात मुबलक पाणी,वीज आणि इतर व्यवस्था आहेत याउलट गावाकडे कुठल्याही सुख सुविधा नाहीत.चालायला नीटसे रस्ते देखील नाहीत. पावसाळ्यात गावी राहणाऱ्या लोकांची वाट ही एकदम बिकट होऊन जाते.अशाच एका भीषण गावच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा या माहितीपटात मांडला आहे. त्या गावातील लोकांनी व्यक्त केलेली मनोगते ही भयानक आणि तितकीच वास्तव आहेत. त्यामुळे त्यांचे ‘वर्तुळ’ कधी पूर्ण होईल अशा आशयाचा हा माहितीपट आहे.

तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर

काव्या ड्रीम मुव्हीज व किरण निनगुरकर यांनी ‘वर्तुळ’ या माहितीपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटातून लोकांचे प्रश्न, सामाजिक समस्या, जाणिवा, कला, संस्कृती, ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान यासारख्या अनेक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. या माहितीपटाची संकल्पना,लेखन व दिग्दर्शन आशिष निनगुरकर यांचे आहे. तर सिद्देश दळवी  यांनी छायाचित्रण केले आहे. अभिषेक लगस यांनी संकलन व पोस्टर डिझाईन केले आहे. प्रदीप कडू,अशोक कुंदप,आशा कुंदप, प्रतिश सोनवणे,चंद्रकांत कुटे,सिद्धेश दळवी, स्वप्नील निंबाळकर व सुनील जाधव यांनी सहकार्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here