‘ब्लॅक पँथर’ चॅडविक बॉसमनचे निधन

​chadwick boseman

हॉलिवूड अभिनेता चॅडविक बॉसमन (​chadwick boseman) याचं शुक्रवारी निधन झालं. मार्व्हल स्टुडिओच्या ‘ब्लॅक पॅथर’ सिनेमात साकारणारा चॅडविक ४३ वर्षाचा होता आणि गेल्या ४ वर्षांपासून कॅन्सरने पीडित होता. चॅडविक ​(chadwick boseman)हा कोलोन कॅन्सरने पीडित होता. त्याच्या लॉस एंजलिस येथील राहत्या घरी निधन झालं.
न्यूज एजन्सी एपीच्या रिपोर्टनुसार, चॅडविकच्या प्रतिनिधीने सांगितले की, चॅडविकची पत्नी आणि शेवटच्या क्षणी त्याच्यासोबत होते. चॅडविकला कोलोन कॅन्सर होता. सुपरस्टार चॅडविकच्या परिवाराने एक माहिती जारी केली असून ज्यात सांगितले की, ‘तो एक खरा योद्धा होता. चॅडविक आपल्या संघर्षाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते सगळे सिनेमे पोहोचवले ज्यांना तुम्ही खूप प्रेम दिलं’. परिवाराने सांगितले की, चॅडविकने गेल्या ४ वर्षात अनेक सिनेमांचं शूटींग केलं आणि शूटींग त्याच्या अनेक सर्जरी आणि कीमोथरपीमध्ये होत होतं. ब्लॅक पॅंथरमध्ये सम्राट टि-चालाची भूमिका साकारणं त्याच्यासाठी सन्मानाची बाब होती.
तापसीचा ‘रश्मी रॉकेट’ लवकरच फ्लोअरवर
​chadwick boseman
चॅडविकने त्याच्या करिअरमध्ये ‘४२’ आणि ‘Get on Up’ सारख्या सिनेमातून आपली जागा निर्माण केली. २०१८ मध्ये आलेल्या मार्व्हलच्या ब्लॅक पॅंथरमध्ये टि-चालाची भूमिका साकारून तो जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उरतला होता. त्यानंतर तो एव्हेंजर्स इनफिनिटी वॉर आणि एव्हेंजर्स-एंड गेमसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमातही ब्लॅक पॅंथरच्या भूमिकेत दिसला. त्याचा शेवटचा सिनेमा ‘Da 5 Bloods’ याचवर्षी रिलीज झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here