‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन गायब?

netflix

भारतातील कुप्रसिद्ध शक्तिशाली भांडवलदारांच्या भ्रष्टाचारांचा आढावा घेणारा माहितीपट (वेबसीरिज) नेटफ्लिक्स या प्लॅटफॉर्मने तयार केला असून येत्या २ सप्टेंबर रोजी तो प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला. मात्र, आता हा ट्रेलर नेटफ्लिक्सवरुन काढून टाकण्यात आला आहे. ही वेबसीरिजवर ज्या फसव्या उद्योजकांवर आधारित आहे त्या उद्योजकांनी याच्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला असून दिल्ली हायकोर्टासह कनिष्ठ कोर्टांमध्ये धाव घेतली आहे.

ग्रामीण  प्रश्न’वर्तुळ’ आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात…
netflix
बिहारमधील स्थानिक अरारिया कोर्टाने गेल्या आठवड्यात ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’ या वेबसीरिजच्या प्रदर्शनावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. या कोर्टात सहारा उद्योगाचे सर्वोसर्वा सुब्रतो रॉय यांनी वेबसीरिजच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती. तसेच पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी याने देखील दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करुन वेबसीरिज प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवण्यात यावी अशी मागणी केली होती. दरम्यान, या बिहारच्या कोर्टाने आणलेल्या स्थिगितीविरोधात नेटफ्लिक्स पुढील आठवड्यात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. मात्र, नेटफ्लिक्सने या ‘बॅड बॉय बिलेनिअर्स’चा ट्रेलर आपल्या प्लॅटफॉर्मवरुन काढून टाकला आहे. मात्र, युट्यूबर तो अद्यापही ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here