दिशा गुंतलेय ‘स्क्रिप्ट रिडींग’मध्ये…

disha patani

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनने मनोरंजन उद्योगासहित सर्वांच्या आयुष्याला एक ब्रेक लागलेला आहे. त्याचवेळी, अभिनेत्री दिशा पटानीने (Disha patani) कामासोबत जोडले राहणे आणि या वेळेचा सदुपयोग करण्याचे ठरवले आहे.
या दिवसांमध्ये दिशा ऑनलाईन झूम नरेशनमध्ये भाग घेते आहे, ती खूपशा नव्या स्क्रिप्ट वाचते आहे आणि लवकरच काही प्रोजेक्ट्स फाइनल करणार आहे. आपल्या कामाप्रति असलेले दीशाचे समर्पण अविश्वसनीय आहे आणि अभिनेत्रीने लॉकडाऊन मधील वेळेची सकारात्मक बाजू पहाण्याचे ठरवले असून या वेळेचा जेवढा होऊ शकेल तेव्हढा सदुपयोग करत आहे.
अभिनेत्रीने बैक टू बैक दोन मोठ्या ब्रांड एंडोर्समेंटची घोषणा देखील केली असून आपल्या अनोख्या प्रमोशन सोबत ती आणखी नव्या एंडोर्समेंटच्या संधी शोधत आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. कामाशी जोडून राहण्यासाठी नव्या स्क्रिप्ट्स वाचण्यासोबतच, अभिनेत्री बरेलीमध्ये आपल्या परिवाराची काळजी देखील घेते आहे. यासोबतच, दिशा आपल्या फिजीकला नियमित ठेवण्यासाठी कठिण वर्कआउट शेड्यूलचे पालन करत आहे कारण ती लवकरच आपला आगामी चित्रपट ‘राधे’च्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात करणार आहे.
‘स्वराज्यजननी जिजामाता’ रंजक वळणावर
disha patani
अभिनेत्रीने ‘मलंग’मधील आपल्या आकर्षक अवतार आणि व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. यासोबतच, दिशा लवकरच ‘एक विलेन 2’ मध्ये दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन ‘मलंग’चा दिग्दर्शक मोहित सूरी करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here