आदित्य पौडवालचं निधन

aditya

मुंबई:
प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचे निधन झालं. आदित्य ३५ वर्षांचा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती.मूत्रपिंडाच्या समस्येमुळे आदित्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शनिवारी सकाळी आदित्यची प्राणज्योत मालवली. करोनाचा प्रादुर्भाव असल्याने नियमांचं पालन करत मुंबईत आदित्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.अनुराधा पौडवाल यांचे पती अरुणसुद्धा संगीतकार होते. नव्वदच्या दशकात अनुराधा पौडवाल करिअरच्या शिखरावर होत्या. त्यावेळी त्यांचे पती अरुण यांचं निधन झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here