‘झी युवा’वर होणार ‘फत्तेशिकस्त’

Fatteshikast

छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्राच्या जनतेच्या ह्रद्यात अढळ स्थान आहे. अशा या महान व्यक्तिमत्वावर आधारित आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये लढलेल्या अनेक लढायांपैकी एका लढाईवर आधारित फत्तेशिकस्त हा मराठी सिनेमा. या सिनेमाला महाराष्ट्राच्या जनतेने भरपूर प्रेम दिलं आणि आता हा सिनेमा झी युवा वाहिनीवर झळकतोय. येत्या रविवारी म्हणजेच 27 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता हा सिनेमा झी युवा वाहिनीवर दाखवला जाणारे.
शिवाजी महाराजांनी पुण्यात मुघलांवर केलेल्या एका अविस्मरणीय हल्ल्यावर फत्तेशिकस्त हा सिनेमा आधारलाय. शायिस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला असताना महाराजांनी मोजक्या मावळ्यांच्या साहाय्याने लाल महालावर हल्ला करुन शायिस्तेखानाची बोटे छाटली होती, हा हल्ला समस्त मुघल सैन्याला मराठ्यांकडून दिलेली जोरदार चपराक होती. याच हल्ल्यावर हा सिनेमा आधारित आहे. मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनुप सोनी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे सारख्या कलाकारांनी या सिनेमात महत्वाच्या भुमिका साकारल्यात. दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमामधली गाणी देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केली आहेत.
Fatteshikast

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here