नावाजतोय ‘सिरीयस’ ‘नवाज’

इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी करिअरच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयाने मंत्रमुग्ध केले आहे. अशाच एका अभिनेत्याने, ज्याने प्रत्येक भूमिकेसाठी निर्दोष सादरीकरण करून कामाप्रती असलेली निष्ठा सिद्ध केली आहे, तो इतर कोणी नाही – नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. जागतिक कीर्तीचा अभिनेता म्हणून पुन्हा एकदा प्रकाशझोतात चर्चेत आला आहे आणि सीरियन्स मेनमधील त्याच्या दिमाखदार अभिनयासाठी आणि ज्या प्रकारे त्याने प्रत्येकाला चकित केले आहे त्याबद्दल प्रेक्षक आणि समीक्षकांकडून अतुलनीय प्रेम मिळत आहे. हे पाहून दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनीही न राहवून सीरियस मेनमध्ये अयान मणीच्या भूमिकेबद्दल नवाझ यांचे कौतुक केले आहे.
अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे कौतुक करताना सुधीर मिश्रा म्हणाले, “नवाज एक हुशार अभिनेता आहे! तो एक अभिनेता म्हणून खूपच अस्खलित आणि पारदर्शक आहे आणि कथा सांगण्यात अजिबात अडथळा आणत नाही. चतुराईने आणि इतकी सुंदरपणे त्याच्या पात्रात समरस होण्याची त्याची क्षमता अप्रतिम आहे. त्याला एखाद्या सीनचे मूल्य नेहमीच समजते आणि कधीकधी तो स्वेच्छेने तो सीन आपल्या सह-अभिनेत्याला देतात. नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा मला उत्तम अनुभव मिळाला ”
एवढेच नाही ! नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या उत्तम अभिनयाबद्दल मनोरंजन क्षेत्रातील नामांकित मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले आहे; आणि त्यांचे म्हणणे काय आहे ते  पाहू या!
navaj
अनुभव सिन्ह (@anubhavsinha) याचे ट्विट:
तुम्हाला व्यंगात्मक आणि विनोदातील सटायर अनुभवायचा आहे का? तुम्हाला या दही कधीही न पाहिलेला @Nawazuddin_S पाहायचा आहे का? तुम्हाला मुख्य प्रवाहातील मॅव्हरिक दिग्दर्शक पहायचे आहेत?@IAmSudhirMishra
SERIOUS MEN. @NetflixIndia https://twitter.com/anubhavsinha/status/1312269081026887681?s=20

अनुराग कश्यप (@anuragkashyap72) यांचे ट्विट:
…….. Serious Men ❤️ @IAmSudhirMishra @Nawazuddin_S @NetflixIndia @manujosephsan https://twitter.com/anuragkashyap72/status/1312443516199469058?s=20

दिव्या दत्ता (@divyadutta25) यांचे ट्विट:
#the seriousmen मनापासून आवडला !! व्यंगात्मकता अतिशय उत्तम !! @IAmSudhirMishra तुम्ही दिलेल्या या रंगछटा कोणीही दुसरे देऊ शकत नाही! !! आणि @Nawazuddin_S तू खूप उत्तम काम केले आहेस, अर्थात नेहमी सारखेच!! आणि खूप सुंदर टीम! @NetflixIndia https://twitter.com/divyadutta25/status/1312328612624789505?s=20

शेखर कपूर (@shekharkapur) यांचे ट्विट:
अक्षत दासने केलेल्या मासूमनंतर बहुधा बाल कलाकारांची सर्वोत्कृष्ट कामगिरी, @IAmSudhirMishra आजवरचे तुझे सर्वोत्कृष्ट काम, @Nawazuddin_S पुन्हा एकदा सिद्ध करून दाखलेस की सामन्यातील असामान्य आहेस #seriousmen @manujosephsan यांच्या कादंबरीवर आधारित चित्रपट एकदा पाहावा असाच आहे. सिरीयस मेन. https://twitter.com/shekharkapur/status/1312355848128143361?s=20

सुधीर मिश्रा दिग्दर्शित हा चित्रपट तामिळ दलित वडिलांच्या जीवनाभोवती गुंफला आहे.  ज्याची आपल्या मुलाने रूढी मोडण्याची आणि जीवनात यशस्वीतेची नवीन उंची गाठावी अशी इच्छा आहे आणि नवाझुद्दीन सिद्दीकी, श्वेता बसू प्रसाद, नासार आणि इंदिरा तिवारी यांच्यासह इतर कलाकारांनि यात काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here